खराबवाडी गावातून ८५ वर्षीय वृद्ध महिला बेपत्ता..!
News15 मराठी प्रतिंनिधी विश्वनाथ केसवड
चाकण : खराबवाडी गावातील वसंत जंबुकर यांच्या भाड्याच्या खोलीत राहत असलेल्या निलाबाई सखाराम सहेजराव(वय-८५ वर्षे) नामक वृद्ध महिला ३० एप्रिल २०२३ रोजी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास कुणाला काही न सांगता घरातून निघून गेली आहे.
वृद्ध बेपत्ता महिलेच्या मुलाने पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून वृद्ध महिलेचे वर्णन पुढील प्रमाणे- महिलेचा रंग गोरा, ऊंची साधारणता: ५ फुट, चेहरा सरळ, नाक सरळ, केस काळे पांढरे लांब, गळ्यात काळ्या मण्याची पोत, हातात काचेच्या हिरव्या बांगड्या, अंगात निळ्या रंगाची साडी, पायात चॉकलेटी रंगाची चप्पल अशा वर्णनाची महिला कुणाला आढल्यास तात्काळ महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याला संपर्क करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
वरील प्रकरणाचा तपास महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार हनुमत बांगर हे करत आहेत.