जेवणाळा येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - दिनदयाल गिऱ्हेपुंजे, लाखनी
आज दि.06/11/2023 रोजी (सोमवार) सत्यसाई संघटना जिल्हा भंडारा सेवा समिती जेवनाळा/पालांदुर अंतर्गत महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय जेवनाळा येथे; डॉ.महात्मे ऑय बॅक ऑय हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी व मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच जनरल तपासणी व औषध वाटपही करण्यात आले.
तत्पुर्वि कार्यक्रमाची सुरवात सत्यसाईबाबांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून, जिल्हा अध्यक्ष धनराजजी माहुले यांनी सत्यसाई व शिबिराच्या आयोजना संबंधी मार्गदर्शन केले. मानवसेवा हिच ईश्वर सेवा आहे. त्याग आणि प्रेमाणे मानवाचे भले होऊ शकते असे मार्मिक मार्गदर्शन केले. सदर शिबिरात जनरल 117 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच नेत्रतपासणी 163 रुग्णांची करुन, त्यामध्ये 78 रुग्णांची मोतीयाबिंदु शत्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. धनराजजी माहुले जिल्हाध्यक्ष भंडारा, डॉ. प्रमोदजी जवंजार, डॉ. डोंगरवार महात्मे नेत्रालय नागपूर, बाळकृष्ण कानतोडे, सुरेश लांबकाने आदि सेवकांनी कार्यक्रमात सेवा दिली. कार्यकमाचे संचालन नितिन रणदिवे व आभार प्रदर्शन कूष्णाजी जांभुळकर यांनी केले.