कळस गावातील एक अवलिया करतोय सर्वसामान्यांचे केसकर्तन करून अनोखी समाजसेवा..

News15 प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

अकोले : सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सलून व्यवसाय शंभर टक्के बंद असल्याने कळस बु मधील हॉटेल ओम साईचे मालक आण्णासाहेब वाकचौरे यांनी आपल्या कळस गावातील गोरगरीब, भोळी भाभडी, कष्टकरी मुले व लोकांना कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून व आपणही या महाभयंकर अशा कोरोनो व्हायरस संकटात गावातील लोकांना काहीतरी मदत करु शकतो व काही तरी समाज्याचे देने लागतो या उद्देशाने स्वतःच्या घरी विनामुल्य बारीक मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तीचे दाढी असो की कटिंग आपला व्यवसाय नसतानाही सरकारी सर्व नियमांचे पालन करुन करत आहेत. आण्णासाहेब वाकचौरे हे कॉलेजला असताना त्यांचा त्या वेळेचा खास मित्र न्हावी समाज्याचा सुनिल वाघ हा असल्याने मित्राच्या संघतीमध्ये एक कला म्हणून केसकर्तण व दाढी करणे ही कला गमती गमतीने अण्णासाहेब यांनी शिकवून घेतली होते. तीच कला आज या २२ ते २३ वर्षाने समाजाला नाभूतो ना भविष्य अशी कामाला आली आहे. त्यावेळी सर्व मित्रांना चेस्टेचा व मस्करीचा विषय असायचा आणि आज तेच मित्र कोरोना व्हायरसमुळे अण्णासाहेब यांना फोन करुन विचारतात कि? आमचा नंबर लागेल का?मित्रानो जीवनाचा प्रवास करत असताना प्रत्येक पायरीवर पाय ठेवल्यावर आपल्याला बरेच काही शिकायला मिळते पण आपन त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन पुढे प्रवास करित असतो. कोणताही व्यक्ती किंवा कलाकार हा आईच्या पोटातून शिकून येत नसतो त्याला त्याची भौगोलिक व वैचारिक परिस्थिती त्यांच्यातील गुणांना शिकवत असते. या गोष्टी पासून कळस बु व पंचक्रोशीतील मुलांनी अशा गोष्टींचा आदर्श चिंतन करुन कोणत्याही व्यवसायकडे वाईट नजरेने न पाहता एक कला म्हणून जर पाहिले तर निश्चितच अष्टपैलू व्यक्तीमत्व निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही. सौ. दौलत वाकचौरे