ग. भा. नानीबाई गबाजी वाकचौरे यांचे ९० व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
अकोले : कळस बुद्रुक गावचे प्रगतशील शेतकरी बादशहा गबाजी वाकचौरे व सुपरिचित कायदेतज्ञ बाळासाहेब गबाजी वाकचौरे यांच्या मातोश्री ग. भा. नानीबाई गबाजी वाकचौरे यांचे वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धपकाळाने शनिवार(दि.६) रोजी रात्री ९ वाजता निधन झाले.
अतिशय प्रतिकूल परस्थितीत आजी नानीबाई यांनी आपला संसाराचा गाडा ओढून कुटूंबाला सुबत्तेकडे घेऊन गेल्या. घरातील मोठ्या असल्याने सर्व कुटूंबाची जबाबदारी व सांभाळ अतिशय उत्तम प्रकारे करून एक आदर्शवत माता व कुटूंब त्यांनी घडवले.
स्वतःचे दोन मुलं व दोन मुली त्याच बरोबर दिर भावंड, पुतणे, पुतण्या या सर्वांचा सांभाळ आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य घडवीण्यामध्ये आजी नानीबाई यांचा मोठा वाटा असल्याचे कुटूंबातील सदस्य बोलून दाखवत आहेत. त्यांच्या घरातील सदस्य आजही सांगतात की, बाई घरात आल्यापासून आमच्या कुटूंबाचा उत्कर्ष झाला. आणि तोच उत्कर्ष शेवटच्या श्वासापर्यंत टिकवून ठेवण्याचे काम या मातेने केले आहे.
आजी नानीबाई यांच्या कष्टामुळे आज घरातील मुलं, पुतणे, नातू सामाज्यात एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून वावरताना दिसत आहेत. त्यांचे दोन नातू वकील, त्यांचा एक पुतण्या व एक नातू राजकारणात सक्रिय आहेत. एक पुतण्या डॉक्टर आहेत. बाकीचे आपापल्या क्षेत्रात उत्तम काम करत आहेत.
आजी नानीबाई यांनी ऊस तोडीचे कामे करून, शेतात राबून, अतीव कष्ट भोगून कुटूंबाला सोन्याचे दिवस दाखवले आहेत. त्यामुळे त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटूंबाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पच्छात दोन मुलं, दोन मुली, नातू, नाती, पंतु असा मोठा परिवार आहे. त्या ह. भ. प. विष्णू महाराज वाकचौरे यांच्या मोठ्या भाऊजयी होत्या.
आजी नानीबाई वाकचौरे यांना News15 मराठी परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली