रस्ता दुरुस्ती : चाकण-तळेगाव रस्त्यावर स्थानिक नागरिकांकडून गतिरोधक टाकण्याची मागणी..!
![रस्ता दुरुस्ती : चाकण-तळेगाव रस्त्यावर स्थानिक नागरिकांकडून गतिरोधक टाकण्याची मागणी..!](https://news15marathi.com/uploads/images/202412/image_750x_676175c8235f4.jpg)
News15 मराठी प्रतीनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : सध्या चाकण-तळेगाव रस्त्याची डागडुजी करण्याचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)प्रशासनाने हाती घेतले आहे. पण रस्त्याची डागडुजी केल्याने रस्त्याला जे गतिरोधक होते ते नाहीशे झाल्याने वाहनाचा वेगवाढून रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्ज्याची डागडुजी झाल्याचेही दिसून येत आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) प्रशासनाकडून रस्त्याच्या डागडुजीचे काम अतिशय संत गतीने सुरु असल्याने नक्की छोटे गतिरोधक कधी टाकले जाणार आणि सर्वसामान्य नारीकांना दिलासा कसा मिळणार हे पहावे लागणार आहे. चाकण-तळेगाव रस्त्यावर राणूबाई मळा येथील संजीवनी हॉस्पिटल समोर, महादेवी ट्रेडिंग दुकानासमोर, ग्रामपंचायत खराबवाडी समोर, नवमहाराष्ट्र विद्यालयालासमोर, वाघजाई फाटा येथे, कल्याण वडेवाले समोर, महाळुंगे इंगळे गाव कमान समोर, बजाज कंपनी समोर, एच पी. चौक आदी. ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्याकडून करण्यात येत आहे. त्यात या अगोदर नमूद ठिकाणी जुने गतिरोधक होते पण रस्त्याच्या डागडुजीत ते गतिरोधक बुजले गेल्याने नवीन गतिरोधकांची मागणी स्थानिक नागरिकांच्यामधून करण्यात येत आहे.
यावर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी ज्या ठेकेदाराला रस्त्याच्या डागडुजीचे काम दिले आहे आम्ही लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करणार आहोत. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे त्याबाबत त्यांना विचारले असता असे कुठे काम झाले असेल तर त्याचीही दुरुस्ती करून आणि रस्त्यावर गतिरोधक व पांढरे पट्टे मारण्याचे काम पुढील २/३ दिवसात पूर्ण करण्यात येईल.यावर आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) प्रशासन किती तत्परता दाखवते हेच पहावे लागेल.