महिलांनी सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हावे - नीता पाटील

महिलांनी सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हावे - नीता पाटील

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी : आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये महिलांनी सक्षम होऊन तसेच आरोग्याची काळजी घेऊन सामाजिक क्षेत्रामध्ये सहभागी व्हावे असे प्रतिपादन सह्याद्रीच्या नीता पाटील यांनी केले. दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथे आज दि.13 रोजी येथील मारुती मंदिरात ग्रामपंचायतच्यावतीने राष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी पाटील बोलत होत्या.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अश्विनी दोडके ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुकेश घरटे, श्रीमती डोळस, ग्रा.पं. सदस्य शरद बदादे, पागे, ग्रामसेवक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

पाटील पुढे म्हणाल्या की, महिलांनी माझे आरोग्य माझी जबाबदारी त्यामुळे आपल्या आरोग्य बरोबर स्वच्छतेची काळजी घ्यावी. अशा कार्यक्रमांमुळे सामाजिक बांधिलकी जपली जाते व विचारांची देवाणघेवाण होते. तसेच बचत गटाच्या महिलांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक करून हळदी कुंकवाचे पाटील यांनी महत्त्व सांगितले. यावेळी महिलांसाठी स्पर्धेचे आयोजित आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आलेल्या महिलांना सह्याद्रीच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व वान देऊन गौरविण्यात आले. यावेळी नीता पाटील यांचा ग्रामपंचायतच्यावतीने सरपंच अश्विनी दोडके यांनी सत्कार केला.

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य संगीता शिंदे, वनिता ब्राह्मणे, रेश्मा भेजेकर, भारती जाधव, हेमलता दोडके, वर्षा निकम, महिला बचत गटाच्या आशा कदम, सपना कदम, वैशाली बदादे, दिपाली मोरे, कल्पना शिंदे, मुक्ताबाई बदादे, हिराबाई चव्हाणके, कल्पना शिंदे, आदिसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.