खराबवाडी गावच्या पोलिस पाटील पदी पुन्हा किरण किर्ते यांची निवड ...!

खराबवाडी गावच्या पोलिस पाटील पदी पुन्हा किरण किर्ते यांची निवड ...!

News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : खराबवाडी गावच्या पोलिस पाटील पदी पुन्हा एकदा किरण विजय किर्ते पाटील यांची उच्चांकी ७९.५ गुण मिळवून निवड करण्यात आली आहे.

किरण किर्ते यांनी कोरोंना काळात तसेच खराबवाडी गावातील जिल्हा प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदावर यशस्वी असे काम केले आहे. त्याच बरोबर स्वत:च्या बुद्धीमत्तेच्या जोरावर त्यांनी पोलिस पाटील परीक्षेत उच्चांकी गुण मिळवून खराबवाडी सारख्या गावच्या पोलिस पाटील पदावर विराजमान होण्याचा मान मिळवला आहे.

किरण किर्ते यांनी काही वयक्तिक कारणामुळे पोलिस पाटील पदाचा राजीनामा दिला होता. पण पुन्हा सामाजिक कामाची आवड त्यांना स्वस्त बसून देत नसल्यामुळे त्यांनी पुन्हा पोलिस पाटील पदाची परीक्षा देऊन हे यश संपादन केले आहे. किरण किर्ते यांची पोलिस पाटील पदावर निवड झाल्या बद्दल त्यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.