कोराटे दूध उत्पादक संस्थेची सभा खेळीमेळीत संपन्न...

कोराटे दूध उत्पादक संस्थेची  सभा खेळीमेळीत संपन्न...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

वलसाड जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित अलीपुर प्रणित कोराटे दूध उत्पादक असोसिएशन या संस्थेची दुसरी वार्षिक सर्वसाधारण उत्साहात पार पडली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी नामदेव कदम होते. प्रमुख पाहुणे म्हणून करंजवन युनिटचे इन्चार्ज आंबेदकर पर्यवेक्षक अरुण  जाधव हे होते. 

यावेळी सभेमध्ये संस्थेस संघाकडून मिळालेली बोनस रक्कम १३१७११ रुपये व संस्थेच्या नफ्यामधून रक्कम रु.१०८१८९= ०० असे एकूण 239900 रुपये बोनस वाटप याशिवाय  दूध उत्पादकांनी दूध पुरवठा केलेल्या दुधाचे रकमेस ५% याप्रमाणे एकूण रक्कम वाटप   करण्यात आले. 

याप्रसंगी सर्वात जास्त दूध  पुरवठा करणारे प्रथम तीन क्रमांकाचे दूध उत्पादक प्रथम वसंत कदम यांना द्वितीय बबन कदम तृतीय मदन  कदम यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा यावेळी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

या सभेमध्ये वसुधारा दूधडेरीचे आंबेडकर यांनी पशु संगोपन,वासरी संगोपन,चारा व्यवस्थापन,दुग्ध व्यवसाय बाबत  मार्गदर्शन केले.संस्थेच्या पारदर्शक कामाबद्दल गावच्या नागरिकांनी व दूध उत्पादकांनी समाधान व्यक्त केले.  यापुढे यापुढेही असेच कामकाज चालू ठेवावे अशा संस्थेला त्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दौलत कदम यांनी केले. तर आभार संस्थेचे अध्यक्ष सचिन कदम यांनी मानले. यावेळी दूध उत्पादक शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.