दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांची डाळिंब उत्पादनाकडे वाटचाल

दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांची डाळिंब उत्पादनाकडे वाटचाल

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू केला असून पारंपरिक पिकांना फाटा देत द्राक्ष,फुल शेती बरोबरच डाळिंब पिकाचे तंत्रज्ञान अवगत करत आहे.

तालुक्यातील मोहाडी, कोराटे व जानोरी येथील डाळिंब उत्पादक शेतकरी यांनी संपन्न अ‍ॅग्रोचे संचालक निखिल वामन,एग्रोकॅश फर्टीलायझरचे संचालक संदीप देशमुख,शहाजी कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळदरी,येथील  डाळिंब निर्यातदार शेतकरी नानासाहेब रंधे यांच्या कृषीधन फार्मला भेट देत अभ्यास दौरा करत मार्गदर्शन घेतले.

यावेळी नानासाहेब रंधे यांनी डाळिंबाच्या अधिक उत्पादनासाठी डाळिंब उत्पादकांना दर्जेदार लागवड साहित्य,रोपवाटिका विकसित करण्यात आल्या आहे डाळिंबाच्या प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी डाळिंबाच्या शास्त्रोक्त लागवडीचा अवलंब करणे गरजेचे आहे, असे सांगितले.

यावेळी डाळिंब उत्पादक शेतकरी सचिन ढेपले,प्रवीण देशमुख,किरण  कदम,सागर ढेपले,सौरभ जाधव, किशोर ढेपले,प्रशांत घुमरे उपस्थित होते. तालुक्यात ५०० एकर क्षेत्रावर डाळिंबाचे पीक तालुक्यातील मोहाडी, कोराटे, जानोरी,आंबे,खेडेगाव,वणी,आदी परिसरात सुमारे ५०० एकर डाळिंबाची लागवड करण्यात आली आहे. शेतकरी नाशिक,मुबई सह गुजरात राज्यातील बाजारपेठेत डाळिंब पाठवितात,तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी द्राक्ष पिकाऐवजी डाळिंब लागवडीला प्राधान्य दिले आहे.

प्रतिक्रिया...

शेतकरी बचतगटांना मार्गदर्शन करणार शेती करतांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे,द्राक्ष पिकबरोबरच कमी खर्चाचे व शास्वत पीक म्हणून डाळींब लागवडीला चालना मिळत आहे,शेतकरी बचतगटाच्या माध्यमातून डाळिंब लागवडीसाठी मोफत मार्गदर्शन करणार, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली पाहिजे.

संदीप देशमुख - ऍग्रोकॅश फर्टिलायझर