उन्हाळा सुरू होताच माठाच्या किमतीत वाढ; महागाईचा फटका...

उन्हाळा सुरू होताच माठाच्या किमतीत वाढ; महागाईचा फटका...

प्रतिनिधी - साहिल रामटेके, भंडारा

गरीबाचा फ्रिज म्हणून ओळख असलेल्या मातीच्या माठांना वाढत्या उन्हामुळे चांगलीच मागणी वाढली आहे. माठाच्या आकारमानानुसार पन्नास रुपयापासून तर शंभर रुपयापर्यंत किमती वाढवल्याने पुण्याच्या तीव्रतेसह ग्राहकांना महागाईची झड सोसावी लागत आहे. भुसा माती व कोळसा या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने, त्याचा परिणाम माठावरील किमतीत दिसून येत आहे.

उन्हाळा सुरू होताच माठाच्या किमतीमध्ये वाढ होते. लाल माती व काळ्या माती पासून बनवण्यात येत असलेले माठ थंड पाण्यासाठी स्वस्त पर्याय मानले जातात. कुणाची दहाकता वाढल्याने थंड पाणी मिळण्यासाठी गरिबांचा फ्रिज म्हणून ओळखले जाणारे माप घेण्यासाठी मागणी वाढलेली आहे. यंदा माठाच्या मागणी सोबतच किमतीतही वाढ झाली आहे. कोळसा,भुसा व माती यांचे दर वाढल्याने त्याचा फटका माठाच्या किमतीवरही झाल्याचे विक्रेते सांगत आहेत. त्यामुळे यंदा माठाच्या किमतीत २०ते ३०टक्क्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मातीच्या माठातील पाणी हे नैसर्गिक रित्या थंड होत असते व हे पाणी आरोग्यासाठी सुद्धा चांगला आहे. नागरिक सुद्धा उन्हाळ्यामध्ये माठ आवर्जून खरेदी करतात. बाजारात मातीचे रंगीबेरंगी माठ विक्री करीत आहेत. त्यामाठांना शहरासह ग्रामीण भागांमध्येही मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे चित्र बाजारपेठेतुन दिसून येत आहे.