कादवा सहकारी साखर कारखान्याने केली, संपूर्ण ऊस एफ. आर. पी. अदा...

कादवा सहकारी साखर कारखान्याने केली, संपूर्ण ऊस एफ. आर. पी. अदा...

NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

कादवा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२३  मधील एफ.आर.पी.पोटी अंतिम ऊस बिल रू.२३२.३५ प्रमाणे रक्कम संबंधित ऊस उत्पादक यांचे बँक खाती वर्ग करत; एकूण रु. २७०२.३५ प्रमाणे संपूर्ण एफ. आर. पी. अदा केल्याची माहिती चेअरमन श्रीराम शेटे यांनी दिली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ऊस दर देण्याची परंपरा कादवा ने कायम राखली आहे. 

कादवा सहकारी साखर कारखान्याने२०२२-२३ या गळीत हंगामात ३०३१७५ मे.टन ऊसाचे गाळप करत११.५० टक्के साखर उतारा मिळवत ३४८६०० क्विंटल साखर निर्मिती केली आहे.यंदा इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित होत सुमारे २१.५० लाख लिटर स्पिरीट निर्मिती झाली आहे.या हंगामामध्ये कमी ऊस उपलब्धतेमुळे कमी गाळप झाल्याने साखर कारखान्यांना एफ आर पी प्रमाणे ऊसबिल अदा करणेसाठी अडचणी निर्माण झाल्या अनेक कारखाने एफआरपी देवू शकले नाही मात्र कादवाने टप्प्याटप्प्याने ऊस बिलाची संपूर्ण रक्कम अदा केली आहे.येत्या गळीत हंगामात  इतर कारखान्यांप्रमाणे ऊस बिलाचा हप्ता अदा केला जाईल.

कादवाने आगामी गळीत हंगामाची तयारी सुरू केली असून कार्यक्षेत्रामध्ये ३२८३ हेक्टर,पेठ सुरगाणा ३६३ हेक्टर ऊस लागवड नोंद झालेली असुन गेटकेन मधुन ३१८३ हेक्टर ऊस लागवड नोंद झाली आहे.अशी एकुण ६८३१ हेक्टर ऊस  लागवड नोंद झालेली आहे.तसेच कार्यक्षेत्र व गेटकेन मधुन अजूनही नोंदी सुरू आहे.पुरेशा प्रमाणात ऊस तोड कामगार भरती करण्यात आली आहे.ऊस लागवड वाढण्यासाठी कारखान्याकडून विविध ऊस विकास योजना राबविल्या जात आहे.देखभाल दुरुस्तीची कामे सुरू आहे.सिडफार्म मध्ये ऊसाचे रोपे मागणीनुसार उपलब्ध करुन दिली जात आहे.ऊस उत्पादकांना उधारीत कंपोस्ट खत तसेच रासायनिक खते उपलब्ध करून दिलेले आहे.यंदा पर्जन्यमान कमी असल्याचे सांगितले जात असल्याने शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन चा वापर करत ऊस लागवड करावी ठिबक सिंचन साठी कारखान्याचे धोरणानुसार कारखान्याकडून सहकार्य केले जाईल. 

शासनाने शेअर्सची रक्कम रु१०,०००/- वरुन रु.१५,०००/- केलेली आहे.ज्यांचे शेअर्स  दहा हजार आहे त्यांना २५ किलो तर ज्यांचे शेअर्स पूर्ण होईल त्यांना ५० किलो साखर सवलतीच्या दरात दिली जाणार आहे. शेअर्सची वाढिव रक्कम भरणेस सहकार्य करावे जास्तीत जास्त ऊस लागवड करून कादवास ऊस पुरवठा करावा असे आवाहन चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले. यावेळी व्हा.चेअरमन शिवाजीराव बस्ते,सर्व संचालक, कार्यकारी संचालक हेमंत माने,सर्व अधिकारी उपस्थित होते.