हॉस्पिटल'ला रुग्णा ऐवजी पैसा महत्वाचा.! वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू... भाजप आमदार P.A ची होती बायको...
प्रतिनिधी - पुणे शहर
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने उपचारासाठी तातडीने दहा लाख रुपये जमा करण्यासाठी मागितल्याने, एका गर्भवती महिलेला योग्य वेळी उपचार न मिळाल्याने यात तिचा दुर्देवी मृत्यू झाला असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.
सत्ताधारी भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरख यांनी हा गंभीर आरोप हा प्रकार उघडकीस आणला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे.! ही दुर्दैवी घटना सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक.! P.A सुशांत भिसे यांची पत्नी मोनाली भिसे यांचा सोबत घडली आहे.
सुशांत भिसे हे अमित गोरखे यांचे स्वीय सहायक (PA) आहेत.
आमदार अमित गोरखे यांच्या सांगण्यानुसार; सुशांत भिसे यांची पत्नी मोनाली भिसे ही गर्भवती असल्याने तिला तातडीने सुरुवातीला दीनानाथ मंगेशकर या धर्मदाय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र हॉस्पिटल'ने उपचार करण्यापूर्वी तिच्या कुटुंबीयाकडे दहा लाख रुपये जमा करण्याची मागणी केली. परंतु, कुटुंबाने फक्त तीनच लाख रुपये आता आम्ही जमा करू शकतो असं सांगितल्यानंतर. दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनाने गर्भवती मोनाली भिसे हिला उपचार नाकारून दुसऱ्या हॉस्पिटल पाठविल होत. त्यात तिला उपचार मिळण्यात दिरंगाई झाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला...
मात्र तिचा मृत्यू होण्यापूर्वी तिने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. त्या जुळ्या बाळांची आई दीनानाथ हॉस्पिटलच्या आर्थिक लुबाडणुकीमुळे दगावली आहे. असा आरोप अमित गोरखे यांनी केला आहे.
दीनानाथ हॉस्पिटल संदर्भात अशा प्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून, या संदर्भात येत्या अधिवेशनात मी प्रश्न उपस्थित करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी.अशी मागणी अमित गोरखे यांनी केली आहे.