दिंडोरी येथील ट्रायडेंट प्लस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये खुब्याची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी...

दिंडोरी येथील ट्रायडेंट प्लस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये खुब्याची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी...

NEWS15 मराठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक

रुग्णाला जर कधी मोठी शस्त्रक्रिया करायची आवश्यकता भासली तर त्या रुग्णाला मोठ्या शहरांमध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर महाराष्ट्रातल्या आदी ठिकाणी उपचारासाठी घेऊन जाण्यात येत होते. परंतु आता आपल्याला कुठेही जाण्याची आवश्यकता भासणार नाही अशी सुविधा; ट्रायडेंट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल दिंडोरी मध्ये एक वर्षापूर्वी जनतेच्या सेवेत सुरू झाली आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे हॉस्पिटलचे संचालक डॉ.सिद्धेश जोशी यांनी सांगितले आहे.

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी  येथील मल्हारी सोनवणे यांचे येथील हॉस्पिटल मध्ये दोन्हीही बाजूच्या खुब्यांचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आल्याचे डॉ.सिद्धेश जोशी सहित हॉस्पिटलच्या डॉक्टर टीमने सांगितले आहे. मल्हारी सोनवणे यांना दोन वर्षा पासून खुब्याचा त्रास होत होता. अनेक ठिकाणी उपचारासाठी दाखल झाले पण पाहिजे तसा आराम त्यांना झाला नाही. यावेळी त्यांनी ट्रायडेंट प्लस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सांधेरोपण तज्ञ डॉ.विलास देशमुख, डॉ.भूषण देशमुख यांचेशी संपर्क करून, आपली तकलीफ त्यांना सांगितली. रुग्णाची व्यथा जाणून घेत डॉ.विलास देशमुख, डॉ.भूषण देशमुख यांनी आजाराचे निदान केले आणि रुग्नास दोन्हीही बाजूच्या खुब्याचे प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. उपचार सुरू केले आणि आठ ते दहा तास चाललेली दोन्ही बाजूची खुब्याची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

यावेळी हॉस्पिटलचे सर्व तज्ञ डॉ.भूषण देशमुख, डॉ.दीपक जाधव, डॉ.विलास देशमुख, डॉ.सिद्धेश जोशी, डॉ.ऋषिकेश शिंपी, डॉ. स्वप्नील मराठे यांचे मदतीने शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्याने यादी अनेक शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून, यामुळे ट्रायडेंट सुपर हॉस्पिटलच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.