साईसिद्धी हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम.! 3 दिवसात ६०० नागरिकांची केली मोफत तपासणी...

साईसिद्धी हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम.! 3 दिवसात ६०० नागरिकांची केली मोफत तपासणी...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी येथील महासाई सिद्धी हॉस्पिटल'तर्फे; महाशिवरात्री निमित्ताने 3 दिवस मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत; जवळपास ६०० नागरिकांनी मोफत तपासणी करून घेतली.

ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने आरोग्य शिबीर राबविण्यात आल्याचे साईसिद्धी हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत पिंगळ यांनी सांगितले. सुमारे 600 रुग्णांच्या तपासणीमध्ये नेत्र, स्त्रीरोग, मुतखडा, कॅन्सर, रक्तदाब, बालरोग अशा विविध तपासण्या करण्यात येऊन गरजू रुग्णांना मोफत औषध वाटप करण्यात आले.

यावेळी डॉ. गौरी पिंगळ, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. विजय जगताप, डॉ. आशुतोष उशीर, डॉ. संजय मोरे, डॉ. अमेय पाटील, डॉ. प्रणव छाजड, डॉ. अजित बोरस्ते, डॉ. सारिका पाटील आदींनी तपासण्या केल्या. स्कॉन प्रोजेक्ट्स प्राव्हेट लिमिटेडचे प्रदीप पाटील, संदीप पवार, रिवाल्यू रिसायकलिंग इंडिया कंपनीचे शैलेंद्र भावसार, भूषण पगारे व हॉस्पिटलचे कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले.

शिबिरात ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान...

रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने; महासाई सिद्धी हॉस्पिटलच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी नाशिक ब्लड बँक, समता ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले.