हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्या'चे, उद्या उद्घाटन...
![हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्या'चे, उद्या उद्घाटन...](https://news15marathi.com/uploads/images/202304/image_750x_644e0717544a0.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : बापू चव्हाण
दिंडोरी : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे दिंडोरी शहरातील आरोग्य उपकेंद्र क्र. गांधीनगर बी. एस. एन. एल. ऑफिस निळवंडी रोड येथे उद्या सोमवार दि. १ मे महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणाली द्वारा सकाळी १० वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे.
दवाखाने आधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनवणे, सातत्यपूर्ण व गुणवत्ता पूर्ण आरोग्य सेवा देणे, विविध रोगांचा प्रादुर्भाव निरीक्षण आणि नियंत्रण करणे, सुलभ व परवडणारी दर्जेदार आरोग्य सेवा देणे,शहरी भागातील गरीब रुग्णांसाठी सुविधा, असे विविध प्रकारचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. या उद्घाटनाप्रसंगी सार्वजनिक आरोग्य व कटू कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजी सावंत राज्याच्या आरोग्यसेवा आयुक्त धीरज कुमार आरोग्य विभागाचे सचिव एन सोना आरोग्य सेवा संचालक डॉक्टर सुनील स्वप्निल ला लाळे आधी मान्यवरांच्या ऑनलाईन प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन दिंडोरी तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी सुभाष मांडगे यांनी केले आहे.