रावणवाडी तलावात बुडून नागपूरच्या युवकाचा मृत्यू .! 24 तासांच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह हाती - तर 21 मित्र थोडक्यात बचावले...

रावणवाडी तलावात बुडून नागपूरच्या युवकाचा मृत्यू .!  24 तासांच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह हाती - तर 21 मित्र थोडक्यात बचावले...

  भंडारा प्रतिनिधी 

 सहलीचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या 22 मित्रांच्या गटावर काळाने घाला घातला पवनी तालुक्यातील रावणवाडी तलावात आंघोळीसाठी उतरलेला नागपूरचा युवक पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडाला 24 तासांच्या अथक आणि थरारक शोधमहिमेनंतर अखेर आज त्याचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले सौरभ मेहरा वय 23 वर्ष राहणार धरमपेठ नागपूर असे मृत युवकांचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे काल घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले स्थानिक मच्छीमार आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने शोधमोहिम सुरू करण्यात आली पहिल्या दिवशी अंधार पडल्यामुळे शोध कार्यात मोठे अडथळे आले परिणामी शोध मोहीम थांबवावी लागली आज सकाळी पुन्हा नव्याने शोध मोहीम हाती घेण्यात आली तासाभराचे अथक प्रयत्नानंतर सौरभच्या मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले 

 मोठे अधिकारी बेपत्ता; एकीकडे पोलीस प्रशासन आणि त्यांची चमू जीव धोक्यात घालून शोध मोहीम राबवत असताना दुसरीकडे महसुल आणि वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी मात्र या घटनेकडे पाठ फिरवून असल्याचे चित्र दिसत आहे प्रशासनाच्या या निरगट्ट कारभारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे कालपासून शोध मोहीम सुरू असताना घटनास्थळी केवळ रावणवाडी येथील तलाठी श्री सागर मॅडम आणि पोलीस कर्मचारी आपली सेवा बजावत आहेत मात्र भंडारा तहसीलदार आर एफ ओ  किंवा इतर कोणत्याही बड्या अधिकाऱ्यांनी अद्याप घटनास्थळी भेट दिलेली नाही सामान्य जनतेच्या जीवाशी खेळ सुरू असताना हे मोठे अधिकारी कुठे आहेत  असा संतप्त सवार मृतांच्या नातेवाईकांनी विचारला आहे 

 रावणवाडी जलाशय आता पर्यटना ऐवजी मृत्यूच्या सापळा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे या ठिकाणी सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नाहीत ना कोणते चेतावणी फलक धोकादायक असूनही कोणतीही तटबंदी किंवा रक्षक नाहीत 24 तास उलटूनही तहसीलदारांना फिरकण्यासाठी वेळ मिळालेला नाही 

 वन विभागाचे दुर्लक्ष?

 फॉरेस्ट राऊंड ऑफिसर वगळता वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी बेपत्ता आहेत एकीकडे पोलिसांनी दिवस-रात्र शोध घेऊन मृत युवकाला बाहेर काढले आणि ज्यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी आहे ते अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवण्यात मग्न आहेत या घटनेमुळे प्रशासनाचा ढिसळपणाच्या कारभार वाटेवर आला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षामुळे संताप व्यक्त केल्या जात आहे तर दुसरीकडे पोलिसांच्या कामगिरीवर नागरिकांनी समाधान व्यक्त केला आहे घटनेच्या पुढील तपास घड्याळ पोलीस करत आहेत.