मण्याड नदीत दोन १७ वर्षीय शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू...

मण्याड नदीत दोन १७ वर्षीय शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू...

प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

अहमदपुर तालुक्यातील शेनकुड येथील मन्याड नदीत बुडून; दोन १७ विर्षीय शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना दि.६ अक्टोबर रविवारी ४.३० ते ५ संयकाळी घडली आहे.

धसवाडी येथिल रहिवासी १७ वर्षीय तुषार दत्तात्रेय पवार आणि टाकळगाव येथील रहिवासी अनिल बाबुराव नागरगोजे रा. भाग्यनगर अहमदपुर हि दोघेजण शाळेला सुटी असल्याने, मन्याड नदीवर पोहण्यासाठी गेले होते. मात्र या दोन्ही मुलांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने; दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती पोलीसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याच बरोबर रुग्ण वाहिका घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेतून अहमदपुर येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांचा मृत देह शवविच्छादनासाठी पाठवण्यात आला आहे. पुढील प्रक्रिया सुरु आहे.