तुमसर शहरात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांची दहशद.! कुत्र्यांच्या हल्ल्यात 5 गंभीर जखमी...

तुमसर शहरात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांची दहशद.! कुत्र्यांच्या हल्ल्यात 5 गंभीर जखमी...

NEWS15 प्रतिनिधी :  साहिल रामटेके

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील नवीन कोर्ट व साई मंदिर परिसरात; सकाळी व्यायामासाठी फिरायला जात असणाऱ्या नागरीकांवर पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांने हल्ला केल्याने, सदर हल्ल्यात पंकज शेंडे व एक महीला गंभीर जखमी झाली आहे. त्या सोबत आणखी 3/4 गंभीर जखमी झाल्याची घटना घडलीय.

तुमसर शहरात पहाटेच्या दरम्यान एक पिसाळलेला कुत्रा आला. त्याने पहाटे व्यायाम करणार्या महिला, पुरुष आणि तरुणांना कळण्याआधी चावा घेण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात येथिल चार ते पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आलीय. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सर्वांना तुमसर येथील सुभाषचंद्र बोस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर  पंकज नामक युवकाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असल्याने, त्याच्यावर  उपचार सुरु आहेत. कुत्रा पिसाळलेला असल्याने  तो अजूनही इतरांसाठी धोकादायक झाला आहे. शहरात सध्या मोकाट कुत्र्याची संख्या चांगलीच वाढली असून, या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.