महाराष्ट्रातील ह्या जिल्ह्यात सकाळ-सकाळी भूकंपाचे धक्के.! भीतीने नागरिक पडले घराबाहेर...

महाराष्ट्रातील ह्या जिल्ह्यात सकाळ-सकाळी भूकंपाचे धक्के.! भीतीने नागरिक पडले घराबाहेर...

प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली

महाराष्ट्रातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील काही भागांना आज सकाळी ६ वा ५ मिनिट आणि ६ वा २४ मिनिटांच्या दरम्यान भूकंपाचे तीन सौम्य धक्के जाणवले असल्याची घटना समोर आली आहे. अचानक धक्के जाणवल्याने नागरिक भीतीने घराबाहेर पडले होते.

सेलू शहरात आणि तालुक्यात सकाळी सहा वाजून दहा मिनिटाला जवळपास ६ सेकंदाचा सौम्य भूकंपाचा धक्का झाल्याचा प्रकार घडला आहे. सहा वाजून दहा मिनिटाला खडखड असा आवाज होत जमीन हादरल्याचा प्रकार जवळपास ६ सेकंद सुरू होता. विशेषतः ज्यांची घरे पत्राची आहेत त्यांना मात्र हा प्रकार मोठ्या प्रमाणात लक्षात आल्याने  धावपळ उडाली. काही वेळातच भुकंपाच्या सौम्य धक्याची माहिती सोशलमिडीयावर व्हायरल झाली. तालुक्यातील चिकलठाणा, देवगांवफाटा या भागात हा सौम्य ६:१२ मि. झाला. नांदेड शहर आणि जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील अनेक गावांत आज सकाळी ६ वा ८ मि आणि ६ वा १९ मि भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने भितीने नागरिक घराबाहेर पडले. नांदेडच्या 'सिडको-हडको' परिसरात देखील सकाळी ०६:०५ ते ०६:०८ वाजेच्यादरम्यान भुकंपाचा सौम्य धक्का जाणवला.

तसेच हिंगोली जिल्ह्यात देखील भूकंपाचे धक्के जाणवले असून, हिंगोली तालुक्यासह वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ तालुक्यात काही ठिकाणी सकाळी दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी पहिला धक्का, तर सहा वाजून 19 मिनिटापर्यंत दुसरा धक्का जाणवला. यावेळी सिरळी गावात काही घराच्या भिंतींना तडे गेले आहेत. 4.2 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यात कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नाही.

भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूरपासून 15 किलोमीटरवर दाखवला जात आहे. प्रशासनाची याबाबतची माहिती दिली आहे.