श्रीमंत 19 वर्षीय तरुणीच्या मर्सिडीज गाडीने गरिबाच्या स्कूटीला उडवल.! पत्नीचा मृत्यू, पती जखमी...

श्रीमंत 19 वर्षीय तरुणीच्या मर्सिडीज गाडीने गरिबाच्या स्कूटीला उडवल.! पत्नीचा मृत्यू, पती जखमी...

NEWS15 मराठी रिपोर्ट - मुंबई

मागील काही दिवसांपूर्वी घडलेल पुण्यातील पोर्शे अपघात आणखी लोक विसरले नसतानाचा आणखी एक तसाच अपघात मुंबई मध्ये घडला आहे. नवी मुंबईतील न्यू पनवेल परिसरात हा अपघात घडला असून, एका १९ वर्षीय मुलीने भरधाव मर्सिडीज कार चालवत; स्कुटीला जोरदार धडक दिली. या अपघातात ५० वर्षीय रेखा यादव यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे पती गंभीर जखमी झाले आहेत.

ही दुर्घटना बुधवार दि. १९ जून रोजी रात्री ८.४५ वाजता हिरानंदानी ब्रिज, पनवेल येथे घडली. आरोपी मुलगी तिथी सिंग (वय १९) हिच्या विरोधात खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार; रेखा यादव आणि त्यांचे पती गोपाल यादव हे स्कुटरवरून कामावरून घरी परत येत होते. शिव-पनवेल महामार्गावरून खाली उतरत असताना तिथी सिंग हिच्या भरधाव मर्सिडीज कारने त्यांच्या स्कुटीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, यादव दाम्पत्य थेट हवेत फेकले गेले. यामध्ये रेखा यादव यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोपाल यादव यांच्या हाताला, पायाला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून, सध्या त्यांच्यावर कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर आसपासच्या नागरिकांनी तत्काळ पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली.

तिथी सिंग ही त्या रात्री बेलापूर येथून तिच्या मित्रांना भेटून घरी परत येत होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरून तिच्या कारनेच अपघात केल्याची खात्री पटली आहे. यामुळे तिच्यावर भारतीय दंड विधानातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गंभीर बाब म्हणजे, ती अल्पवयीन नसून १९ वर्षांची आहे, त्यामुळे तिच्यावर प्रौढ आरोपीप्रमाणेच कारवाई होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून मर्सिडीज कार ताब्यात घेण्यात आली असून वाहनाची तपासणी आणि ब्रेक प्रणाली, स्पीड विश्लेषण यावर फॉरेन्सिक अहवाल मागवण्यात आला आहे.

स्थानिकांनी या घटनेविरोधात संताप व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षा होण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावर देखील “धनदांडग्यांना कायदे सैल?” असा सवाल उपस्थित होत आहे.