देव दर्शनासाठी भाविक घेऊन जाणाऱ्या क्रूझरचा भीषण अपघात.! उभ्या ट्रॉलीला धडक, 13 जण गंभीर जखमी
प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली
हिंगोली जिल्हा औढा नागनाथ तालुक्यातील राजदरी आणि पिंपळदरी येथून वर्धा जिल्ह्याकडे भाविक घेऊन जाणाऱ्या; क्रूझरचा कळमनुरी तालुक्यातील झरा फाटा येथे दि. 14 सष्टेबर रोजी मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की, गाडी थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॉलीवर धडकली आणि यात चालकासह 13 जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमीवर कळमनुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून, पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. तर यातील 6 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातातील सर्व जण वर्धा जिल्ह्यातील टाकळघाट येथे दर्शनासाठी जात होते.