एसटीच्या धडकेत युवक जागीच ठार.! शंकर टॉकीज जवळील घटना...

एसटीच्या धडकेत युवक जागीच ठार.! शंकर टॉकीज जवळील घटना...

प्रतिनिधी - किरण मुक्कावार, यवतमाळ

पुसद वरून दिग्रसकडे भरधाव वेगाने येणाऱ्या; पूसद डेपोच्या एसटीने एका युवकास चिरडल्याची घटना शनिवार दि.९ मार्च रोजी दुपारी ४.४५ च्या सुमारास घडली आहे. 

पुसद डेपोची एसटी क्रमांक MH40 Y5579 ही पुसदवरून नागपूर जात असतांना; भरधाव वेगाने येणाऱ्या एसटीने दिग्रस शंकर टॉकीज जवळ ढकलगाडी वरील रसवंती दुकानदार शेख अकबर शेख हरुल (वय -२६) रा. गणेश मंदिर, पोळा मैदान हा युवक झाडू मारत असतांना त्याच्या अंगावरून एसटीचे समोरील व मागील चाक गेल्याने तो जागीच चिरडल्या गेला. यामध्ये त्याचा मेंदू बाहेर पडला. या घटनेमुळे परिसरात मृतकाच्या नातेवाइकांनी गोंधळ घातला.

या घटनेची पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांना माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस ताफा येऊन परिस्थिती आटोक्यात आणत रुग्णवाहिकेमध्ये मृतदेह उचलून, ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी एसटी चालकाला ताब्यात घेतले आहे. मृतकाच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगा , १ मुलगी, तीन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.