खाडगाव येथे भव्य गाव वाईज ३२ संघ आणि १६ बक्षीसे क्रिकेट स्पर्धेत; किनगाव संघाने पटकावले पहिले बक्षीस..

खाडगाव येथे भव्य गाव वाईज ३२  संघ आणि १६ बक्षीसे क्रिकेट स्पर्धेत; किनगाव संघाने पटकावले पहिले बक्षीस..

NEWS15  मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

किनगाव येथील सगीर क्रिकेट क्लबच्या खेळाडूने या स्पर्धेत भाग घेऊन ५१ हजाराचे प्रथम बक्षीस पटकावले असून या टीममधील सर्व खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

१४ वर्षांनी किनगाव येथील सगीर क्रिकेट क्लब किनगाव यांनी लातूर येथील खाडगाव प्रीमियर लीगचा आंतिम सामना जिंकला आहे. या टीमध्ये (कॅप्टन) जलील शेख, वॉइस कॅप्टन रहिम सय्यद,मोहम्मद शेख,सोहेल जावकर,आयान पठाण,गौस बागवाण,नरसिंग मुंडे,आजित वाहुळे,अझर शेख,अंगद हंगे,नेहाल मोमिण,व्यंकट मुंडे,शिवाजी गोरे,ताज आतार,कटारे,आदिजन उपस्थित होते.