पहाटेच्या सुमारास इमारतीला लागली भीषण आग.! 2 चिमूकल्यांसह गुदमरून 7 जणांचा मृत्यू...

पहाटेच्या सुमारास इमारतीला लागली भीषण आग.! 2 चिमूकल्यांसह गुदमरून 7 जणांचा मृत्यू...

NEWS15 मराठी रिपोर्ट - छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजी नगर येथे एका इमारतीला बुधवार (दि.03 एप्रिल) रोजी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. तर या अग्नितांडवात गुदमरून सात जणांचा मृत्यू झाल्याच समोर आले आहे. या आगीत 3 महिला, 2 पुरुष आणि 2 लहान मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरातील छावनी परिसरात असणाऱ्या टेलरच्या दुकानाला पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.

मिळालेल्या माहितीनुसार; जैन मंदिराच्या शेजारी असणाऱ्या दुमजली घरात ही आग लागली. या घरातील पहिल्या मजल्यावर पहाटे गाढ झोपेत असणाऱ्या लोकांना खाली उतरण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे गुदमरून सात जणांचा मृत्यू झाला. आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. अग्नीशमन दलाने आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे. घरात असणाऱ्या लोकांचा शोध घेतला जात आहे. त्यात मृत्यू झालेल्या सात जणांशिवाय एक जण मिसिंग आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान ही आग कशामुळे लागली, त्याचे कारण समजू शकले नाही. पंचनामा करून मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस आयुक्तांनी पाहणी केली आहे.

ज्या इमारतीला आग लागली ती तीन मजली इमारत होती. या इमारतीच्या खालच्या मजल्यावर टेलरचं दुकान होत. या दुकानात आग लागली आणि आग लागल्यानंतर पहिल्या मजल्यावर वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचा गुदमरल्याने मृत्यू झाला आहे.

असीम वसीम शेख (३ वर्ष), मुलगा परी वसीम शेख (वय २ वर्ष), वसीम शेख अब्दुल अजीज (वय ३० वर्ष), तनवीर वसीम शेख (वय २३), हमीद बेगम अब्दुल अजीज (वय ५०), शेख सोहेल अब्दुल अजीज (वय ३५), रेशमा शेख सोहेल शेख (वय २२ वर्ष), अशी मृतांची नावं आहेत.