मोठी बातमी : खराबवाडी गावातील सारा सिटी रोडला चोरट्यानी सहा दुकाने फोडली..!

मोठी बातमी : खराबवाडी गावातील सारा सिटी रोडला चोरट्यानी सहा दुकाने फोडली..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : खराबवाडी गावातील सारा सिटी रोडवर असणारे अथर्व इलेट्रॉनिक, एस आर बेकरी, स्मार्ट कलेक्शन आणि नावाजलेले महाराष्ट्र इलेट्रॉनिक (दि.३) हे चार दुकानें व दोन मेडिकलचे पहाटेच्या सुमारास शटर उचकाटून चोरट्यानी महत्वाचे साहित्य लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सारा सिटी रोडवर असणाऱ्या चार दुकानें व दोन मेडिकलचे लोखंडी रॉडच्या सहाय्याने शटर उचकाटून महाराष्ट्र इलेट्रॉनिक या दुकानातून टीव्ही, अर्थव इलेट्रॉनिक मधून फॅन व रोख रक्कम, एस आर बेकरी मधून पाचशे रुपये रोख तर उर्वरित दोन मेडिकलमधून नक्की चोरट्यानी किती रक्कम लंपास केली याचा सखोल तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.

सध्या चाकण औद्योगिक वसाहतीत नोकरीच्या नावाखाली आलेले सहज पैसे कमवायच्या नादात काही बाहेरील जिल्ह्यातून व परप्रांतीय तरुण असे उपद्याप करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पहाटे झालेल्या चोरीमधील आरोपी शोधणे हे पोलिसांच्या पुढील मोठे आव्हान आहे.

घटनास्थळी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक दाखल झाले आहे. सर्व माहिती घेऊन चोरांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची शोध मोहीम सुरु झाली आहे.