मोठी बातमी : महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या तपास पथकाची धडाकेबाज कारवाई, मुद्देमालासह ७२ तासात आरोपी जेलबंद..!
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदे गावातील कंपनीतील खिडकीतून आत प्रवेश करून तब्बल ३५ लाख रुपयांची चोरी करून पसार झालेल्या आरोपीना महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने कसोशीने तपास करत अवघ्या ७२ तासात मुद्दे मालासह ताब्यात घेवून जेलबंद केले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, ३१ ऑगस्ट रोजी रात्री २:३० ते ४ वाजताच्या सुमारास चाकण औद्योगिक वसाहतीतील शिंदे गावातील मिरॅकल केबल प्राव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये अज्ञात चोरट्यानी खिडकीतून आत प्रवेश करून तब्बल ३५ लाख रुपये किंमतीचा वेगवेगळ्या प्रकारच्या केबल वायर बंडल व इतर साहित्य स्वतः चे फायद्याकरिता चोरून नेले. या संदर्भात मंगेश सावंत(वय-५५ वर्षे) यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३४(१) नुसार अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण धाडगे व त्यांचे सहकारी अंमलदार यांनी जलदगतीने पारंपारिक व तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत सदर गुन्हा हा १)उस्मान उर्फ बिलाल उर्फ अब्दुल अब्बूहरेरा सहा (वय-२५ वर्षे)मूळ राहणार उत्तरप्रदेश,२)स्वराज शांताराम कालापाड(वय-२५ वर्षे)रा. वराळे, मूळ रा. शेंदूरजना(मोरे)पो. शेलूबाजार, ता. मंगरुळपीर, जि. वाशीम, ३)इम्तियाज सफीउल्ला सहा(वय-२० वर्षे)मूळ राहणार उत्तरप्रदेश यांनी माल चोरून उत्तरप्रदेश येथील काही व्यक्तींना विकला. माल विकलेले बालचंद रामकेशव मोर्या(वय-३१ वर्ष)रा. कुदळवाडी, चिखली, पुणे, मूळ रा. उत्तरप्रदेश, मोहम्मद इम्तियाज अजीज चौधरी (वय-३९ वर्षे)रा. कुदळवाडी, चिखली, मुळ रा. उत्तरप्रदेश यांच्याकडुन वायर सोलून काढलेली १४०० किलो वजनाचे कॉपर, प्लस्टिक आवरण सह गुन्ह्यात गुन्हा करताना वापरलेले दोन छोटा हत्ती वाहने असा मुद्देमाल जप्त करून उर्वरित दोन आरोपीचा शोध सुरु आहे. या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.
सदर कारवाईपोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर घुले, पोलीस अंमलदार राजू जाधव, राजू कोणकेरी, पोलीस हवालदार अमोल बोराटे, युवराज बिराजदार, तानाजी गाडे, विठ्ठल वाडेकर, किशोर सांगळे, संतोष काळे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड, राजेंद्र गिरी, हरी रणदिवे, शुभम खंडागळे, शरद खैरे, राजकुमार हनुमंते यांनी केली आहे.