BIG BREAKING : महाळुंगे MIDC पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, एकास सीताफिने पकडले...!

BIG BREAKING : महाळुंगे MIDC पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, एकास सीताफिने पकडले...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अवैद्य रित्या शस्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या वरिष्ठाच्या आदेशानुसार महाळुंगे ते आंबेठाण रोडलगत, द्वारका सिटी समोर, रॉयल चिकनच्या समोर एका व्यक्तीच्या जवळ पिस्तूल बाळगल्या प्रकरणी मोठ्या सीताफिने महाळुंगे MIDC पोलीसांनी एकास अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार(दि.१५) रोजी दुपारी १५:३० वाजताच्या सुमारास पोलीस अंमलदार अमोल माटे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे एक व्यक्ती जवळ देशी बनावटीचे पिस्तूल व पाच जिवंत काडतुसासह संशयास्पद वावरत असल्याचे निदर्शनास आले. याच माहितीच्या आधारे महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे प्रभारी अधिकारी कल्याण घाडगे यांना समजल्यावर त्यांनी वरिष्ठ अधिकारी नितीन गिते यांना संशयित व्यक्तीच्या बद्दल माहिती दिल्यानंतर त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या सूचनेनुसार द्वारका सिटी समोर, रॉयल चिकन सेंटर जवळ संशयित रित्या थांबलेल्या व्यक्तीस महाळुंगे MIDC पोलिसांच्या तपास पथकाने सोनू नकीक अहमद(वय-३१ वर्षे) रा. प्रवीण बेडभर यांच्या रूममध्ये भाड्याने, महाळुंगे ग्रामपंचायत शेजारी, मूळ रा. बहादूरपूर कच्छा, फुलपूर, प्रयागराज, उत्तरप्रदेश यास सीताफिने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची तपास पथकाचे अंगझडती घेतली असता त्याच्याकडुन ३२५०० रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल व पाच जिवंत काडतूसे मिळून आले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीवर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात शस्र अधिनियम १९५९ कलम ३(२५), सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)/१३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेळोवेळी पोलीस विभागाने परिसरातील रूम मालकांना भाडेकरू यांची माहिती पोलीस विभागाला देण्याच्या सूचना केल्या होत्या. काही रूम मालकांनी प्रामाणिकपणे भाडेकरू यांची माहिती पोलीस विभागाला पुरवली. पण काही रूम मालकांनी तीच माहिती देण्यासाठी चालढकल केली त्यामुळे असे गुन्हेगार यांचे परिसरात फावले आहे. हे रूम मालकांनी गांभीर्याने घ्यायला हवे. त्याचं बरोबर पोलीस विभागानेही कडक पावले उचलून अशा हलगर्जीपणा करणाऱ्या रूम मालकांवर कडक कारवाई करायला हवी. त्याचं बरोबर अल्पवयीन गुन्हेगारीचे प्रमाणही चाकण औद्योगिक वसाहतीत वाढले आहे त्यावर नियंत्रण आणण्यासाठी स्वतः पालकांनी स्वतः मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असे गुन्हे जर कमी करायचे असतील तर पोलिसांनी गुन्हेगांरावर अशीच धडक कारवाई करायला हवी.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशीं, पोलीस उपायुक्त परिमंडळ ३चे शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण विभागाचे राजेंद्रसिंग गौर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष कजबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस हवालदार राजू राठोड, राजेंद्र कोणकेरी, अमोल बोराटे, युवराज बिराजदार, विठ्ठल वडेकर, प्रकाश चाफळे, राजू जाधव, पोलीस नाईक संतोष काळे, सांगळे, पोलीस अंमलदार शिवाजी लोखंडे, राजेंद्र खेडकर, गणेश गायकवाड, अमोल माटे, संतोष वायकर, मंगेश कदम यांनी केली आहे.