आळंदीतील साई पॅलेस हॉटेलवर पोलिसांचा छापा.! १७ महिलांची सुटका, ६ जण अटकेत...

आळंदीतील साई पॅलेस हॉटेलवर पोलिसांचा छापा.! १७ महिलांची सुटका, ६ जण अटकेत...

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड - आळंदी

आळंदी येथील चऱ्होली रोडवरील देऊ फाटा परिसरातील साई पॅलेस हॉटेल येथे सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसाय रॅकेटचा दिघी पोलीस ठाणे यांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल १७ महिलांची सुटका करण्यात आली असून ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी महिलांना पैशाचे आमिष दाखवून या व्यवसायासाठी प्रवृत्त केले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर छापेमारी करण्यात आली. कारवाईदरम्यान सुमारे ₹५२,०७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस शिपाई महेश भारत लाड यांनी फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक (गुन्हे) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:

1. कृष्णा सुरेश पाटील (मॅनेजर)

2. राज मोहन शेट्टी (मॅनेजर)

3. संजय अमोल वावरी

4. भरत दत्तात्रय बिराजदार

5. साबीर अत्तर अली

6. विक्रम हिरा वड

दरम्यान, हॉटेल मालक अवधूत गाढवे व चालक पसलोवन दास हे फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे आळंदी परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून संबंधित ठिकाणी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.