चाकणमध्ये बनावट नोटांचा मोठा रॅकेट उघड; 42.50 लाखांचा मुद्देमाल जप्त...
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड, चाकण
वाहन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा चाकण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल ₹42 लाख 50 हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बारामती येथील फिर्यादी कार विक्रीसाठी चाकण परिसरात आले होते. आरोपींनी मोबाईलद्वारे संपर्क साधून गाडी खरेदीची तयारी दर्शवली. दोन्ही बाजूंमध्ये ₹60 लाखांमध्ये व्यवहार निश्चित झाला.
व्यवहार ठरल्यानंतर आरोपींनी फिर्यादीला ₹3 लाख रोख रक्कम दिली आणि गाडी घेऊन पसार झाले.
मात्र नोटांची तपासणी केल्यावर धक्कादायक प्रकार उघड झाला
वर-खाली खऱ्या नोटा मध्ये पूर्णपणे बनावट नोटा
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने तात्काळ पोलिसांत धाव घेतली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चाकण पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला.
अवघ्या काही तासांत तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली.
अटक आरोपी यांची नावे पुढीलप्रमाणे गणेश ज्ञानदेव ठाकरे,समीर दिनकर महल्ले यांच्या कडून सुमारे
₹42.50 लाखांच्या बनावट नोटा फसवणुकीत वापरलेली अल्टो कार एक मोटारसायकल इतर साहित्य जपत करण्यात आले.
चाकणमध्ये पुन्हा एकदा बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यामुळे मोठा आर्थिक गुन्हा उघड झाला.