चाकण उत्तर पोलिसांची कारवाई; गांजा बाळगणाऱ्या तरुणासह हातभट्टी विक्री करणाऱ्या महिलेला अटक
प्रतिनिधी: विश्वनाथ केसवड चाकण,
चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करत गांजा बाळगणाऱ्या तरुणासह गांजाचे सेवन करणाऱ्या व्यक्तीवर आणि गावठी हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्या महिलेवर कायदेशीर कारवाई केली आहे. ही कारवाई 1 ऑक्टोबर 2026 रोजी तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल राजू इनामदार (वय 27, रा. ब्राह्मणाळी, चाकण) याच्या ताब्यातून तब्बल 551 ग्रॅम गांजा आढळून आला. त्याच्याविरुद्ध NDPS कायद्यानुसार कलम 8(c), 20(b)(ii)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच अंजली असमानतारा राजपूत (वय 25, रा. भाम, ता. खेड) ही गावठी हातभट्टी दारूची विक्री करताना आढळून आल्याने तिच्याविरुद्ध BNS कलम 123 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सुखनंदन नमयी पटेल (वय 36, रा. दावड मळा, चाकण) हा गांजाचे सेवन करताना आढळून आला. त्याच्याविरुद्ध NDPS कायदा कलम 8(c), 27 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकण उत्तर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अमली पदार्थ व अवैध दारूविक्रीविरोधातील पोलिसांची मोहीम सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या कारवाईनंतरही परिसरात अशा प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्यास त्यांच्यावर अधिक कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होण्याची शक्यता आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केली.
vishwanathkeswad