चौथी मुलगी जन्माला आल्याच्या रागातून - जन्मदात्या बापाकडून 3 दिवसाच्या मुलीची हत्या...

चौथी मुलगी जन्माला आल्याच्या रागातून - जन्मदात्या बापाकडून 3 दिवसाच्या मुलीची हत्या...

???? ब्रेकिंग न्यूज | जळगाव

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून अत्यंत धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे.

मोराड गावात अवघ्या तीन दिवसांच्या चिमुकलीची तिच्याच पित्याने निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, चौथी मुलगी जन्माला आल्याच्या रागातून बापाने पोटच्या लेकीचा जीव घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

ही घटना 14 नोव्हेंबर रोजी घडली होती, मात्र मृत्यूला अपघाताचे स्वरूप देत कुटुंबीयांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता.

आंघोळ करताना मुलगी पडून मृत्यू झाल्याचे सांगत पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांचा संशय बळावला. वैद्यकीय तपासणीत मुलीचा मृत्यू अपघाती नसून टणक वस्तूच्या जबर मारामुळे झाल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर पोलिसांनी पुन्हा सखोल तपास सुरू केला असता, आरोपी कृष्णा लालचंद राठोड याने चौथी मुलगी झाल्याच्या रागातूनच हत्या केल्याची कबुली दिली आहे.

या प्रकरणी आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

जन्मताच मुलगी असल्याच्या कारणावरून लेकीचा बळी देणाऱ्या या अमानुष घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरून गेला आहे.

घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.