अनैतिक संबंधातून हत्या.! कोयत्याने सपासप वार करत मुलाने आईच्या बॉयफ्रेंडला संपवल...

NEWS15 मराठी रिपोर्ट - कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरालगत असलेल्या कदमवाडी रस्त्यावर भर दुपारी सेंट्रिंग कामगारावर कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. भर रस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या हल्ल्यात दत्ता शरणाप्पा सुतार वयवर्षे ३० शिवशंभो चौक, मूळ रा. इंदिरानगर यांचा मृत्यू झाला आहे. तर ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलं असून, पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दत्ता सुतार हा सेंट्रिंग कामगार असून, तो पूर्वी इंदिरानगर परिसरात राहत होता. काही दिवसांपासून त्याचे शिवशंभो चौकातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे तो त्या महिलेच्या घरीच राहत होता. त्याच्यासोबत त्या महिलेचा अल्पवयीन मुलगाही राहत होता. हत्येच्या दिवशी सकाळी दत्ता आणि त्याचा मित्र अतुल ठोंबरे कामासाठी बाहेर पडले. दुपारी बाराच्या सुमारास त्या महिलेच्या मुलाने दत्ताकडे पैशांची मागणी केली. पैसे देण्यासाठी दत्ता आणि त्याचा मित्र दुचाकीवरून (एमएच ०९ बीक्यू ४९८५) सांगलीवाडीतून कदमवाडी रस्त्यावर गेले असता; त्याचवेळी संशयित मुलगा आणि त्याचे दोन साथीदार तिथे आले. अनैतिक संबंधाचा राग मनात धरून त्याने दत्ताचा काटा काढण्याचा कट रचला. दत्ता तिथे येताच संशयित मुलाने त्याच्या छातीवर दगड मारला, त्यामुळे दत्ता खाली पडला. त्यानंतर त्याने हातातील कोयत्याने सपासप वार केले. वार इतके वर्मी होते की, दत्ता रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर दत्ताचा मित्र ठोंबरे तेथून पळून गेला. अतिरक्तस्त्राव झाल्याने दत्ताचा जागीच मृत्यू झाला. पोलिस उपाधीक्षक विमला एम. शहरचे निरीक्षक संजय मोरे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. तासाभरात संशयितांना ताब्यात घेण्यात आले. उपनिरीक्षक महादेव पोवार अंमलदार संदीप पाटील गौतम कांबळे, संतोष गळवे यांचा पथकात समावेश होता. परिसरातील शेतकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. अहवालात तोंडावर चार वर्मी वार झाल्याने दत्ताचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी मिळालेल्या हत्यारांनी खून झाला नसून, खुनात वापरलेला कोयता नंतर जप्त करण्यात आला.