वंगे विद्यालयात नेताजी सुभाष चन्द्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी...

वंगे विद्यालयात नेताजी सुभाष चन्द्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी...

प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, शिरूर अनंतपाळ ( लातूर )

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील आनंदवाडी येथील संस्कार वर्धिनी पार्वतीबाई वंगे विद्यालयात दि .23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदू हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे .

शिवनेरी महाविद्यालयाचे प्रा डॉ नारायण सूर्यवंशी , शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानोबा शिरुरे  यांच्या हास्ते सर्वप्रथम  प्रतिमेचे पूजन करण्यात आले . त्यानंतर डॉ . सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी सखोल मार्गदर्शन केले . त्यात मोबाईलचा वापर टाळा आणि जास्ती जास्त पुस्तकांचे वाचन करा त्यामुळे ज्ञान व आत्मा विश्वास वाढतो असे सांगितले .

यावेळी कार्यक्रमासाठी प्रा सोनकांबळे , सहशिक्षक प्रभाकर घाडगे , संदिपान गुरमे , एस व्ही सूर्यवंशी , बाळासाहेब बानाटे , संध्याताई कुंटे , लक्ष्मी मानुरवार , जमीर सय्यद यांच्यासह पालक , विद्यार्थी उपस्थित होते.