श्री. मनोहरराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गुंज'चा उत्कृष्ठ निकाल...

श्री. मनोहरराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गुंज'चा उत्कृष्ठ निकाल...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - किरण मुक्कावार, यवतमाळ

महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती एच.एस.सी.परीक्षा 2024 चा निकाल नुकताच लागला असून स्व.संजय राठोड शिक्षण संस्था गुंज. ता.महागाव जि.यवतमाळ द्वारा संचालित श्री.मनोहरराव नाईक माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय गुंज. ता.महागाव जि.यवतमाळ.येथील विज्ञान व कला शाखेतून 305 विद्यार्थी प्रविष्ठ होते.त्यापैकी 293 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 96.60% लागला आहे. विशेषतः विज्ञान शाखेचा निकाल 99.40% व कला शाखेचा निकाल 91.91% लागला आहे.

विज्ञान शाखेतून श्रेयश संदीप जिल्ल्हेवार हा 88.17% गुण घेऊन प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला असून श्रेयश मनोज लेवाळकर 87.17% गुण घेऊन द्वितीय क्रमांक व कु.धारा विनोद पवार ह्या विद्यार्थिनीने 86.33 % गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला आहे.तसेच कला शाखेतून अविनाश दत्ता बुरकुळे या विद्यार्थ्याने 73.67% गुण घेऊन प्रथम क्रमांकाचा मान मिळविला असून विनोद अनंता आगलावे याने 70 83% गुण घेऊन द्वितीय क्रमांक प्राप्त केला व कु रिया संतोष जाधव ह्या विद्यार्थिनीने 68.00%गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला आहे.तसेच विशेष बाब म्हणजे 47 विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणी ( Distinction) घेऊन उत्तीर्ण झाले असून 135 विद्यार्थी प्रथम श्रेणी घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांनी कठीण परिश्रम करून गुणवत्ता प्राप्त करून शाळेची उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम ठेवली आहे इतकेच नव्हे तर शालेय स्तरावरील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन शाळेचे नाव लौकीक केले आहे विशेषतः कु.स्वरांजली दिगांबर देशमुख ह्या विद्यार्थिनीने राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन तिची  निवड झाल्यामुळे बोर्ड कडून तिला स्पोर्ट्स चे 15 गुण प्राप्त झाले आहेत.इतकेच नव्हे तर या शाळेने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या योजनेअंतर्गत

'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' या स्पर्धेत महागाव तालुक्यातून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले आहे. ग्रामीण भागात असलेल्या या शाळेची उत्तरोत्तर प्रगती पाहून परिसरातील पालक व विद्यार्थी शाळेकडे आकर्षित होत आहेत.गुणवंत विद्यार्थ्यानी प्राप्त केलेल्या यशाबद्दल विद्यालयाचे संस्थापक मा प्रा.शिवाजीराव राठोड यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले व भविष्यासाठी शुयश चींतीले.शाळेचे प्राचार्य श्री.अरविंद जाधव व ॲड.महेश शिवाजी राठोड यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या तसेच सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना प्रा. शरद कांबळे, प्रा.सुरेश जाधव प्रा.जयकिसन पवार, प्रा.फारुक खान, प्रा.राजेंद्र रावते, प्रा.मोबीन चव्हाण, प्रा.संजय काळे, प्रा.विनेश राठोड, प्रा.विनोद पवार, प्रा.वसंत राठोड, प्रा.अमीर शेख, प्रा.आदेश खाडे, प्रा.विशाल केजकर, प्रा.कु हर्षा राऊत.यांचे मार्गदर्शन लाभले.