गुणवत्तेचा आलेख सदैव उंचवात ठेवू - गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी

गुणवत्तेचा आलेख सदैव उंचवात ठेवू - गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी

NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण

दिंडोरी : कोशिंबे केंद्राची शिक्षण परिषद दिंडोरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी, कोशिंबे बीटाच्या माजी शिक्षण विस्तार अधिकारी वंदना चव्हाण, कोशिंबे बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी के.पी.पगार,केंद्रप्रमुख तारा धुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत निरोप आणि कोशिंबे बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी पद ग्रहण सोहळा उत्साहाच्या वातावरणात पार पडला.

दिंडोरी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल चंद्रकांत गवळी यांचे स्वागत, कोशिंबे बीटाची अतिशय उत्कृष्टपणे प्रशासकीय धुरा सांभाळणार्‍या शिक्षण विस्तार अधिकारी वंदना चव्हाण यांना निरोप तर कोशिंबे बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी पद स्वीकारल्या बद्दल; के. पी.पगार स्वागत कोशिंबे केंद्रातील शिक्षकांच्या वतीने खांडवी, नंदकुमार गांगुर्डे, अनिल गायकवाड, श्रीमती वाघ, श्रीमती देशपांडे, अशोक बागुल यांच्याकडून करण्यात आले.

मान्यवरांनी शिक्षण परिषदेत सर्व कोशिंबे केंद्रातील शिक्षकांना मार्गदर्शन केले.दिंडोरी तालुक्याचा गुणवत्तेचा आलेख सतत चढता ठेवू, असे प्रतिपादन गटशिक्षण अधिकारी चंद्रकांत गवळी यांनी केले. त्याचबरोबर कोशिंबे बीटात काम करत असताना सर्व शाळांमधील काम व्यवस्थितपणे चालू असून बीटात राबविल्या जात असलेल्या उपक्रमांची माहिती वंदना चव्हाण यांनी आपल्या निरोपाच्या भाषणाच्या वेळी दिली.  परोपकारी वृत्तीने कार्य करत राहिल्यास आपणांस जीवन जगतांना आनंद अनुभूती मिळत असते. ज्ञानदानाचे पवित्र कार्य अविरत चालू ठेवावे. असे सांगून पगार यांनी काही प्रशासकीय सूचना दिल्या. चालू शैक्षणिक वर्षी ऑनलाईन बदलीने हजर झालेल्या सर्व शिक्षक - शिक्षिकांचे केंद्राच्या वतीने स्वागत करण्यात आले. मागील शैक्षणिक वर्ष जिल्हा परिषद नाशिकने राबवलेल्या परसबागांच्या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल बंधारपाडा शाळेचे तसेच ब्रम्ह्याचा पाडा शाळेचे पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. तसेच टिटवे शाळेतील साहित्यिक शिक्षक उत्तम चारोस्कर यांची पुस्तके मान्यवरांना देण्यात आली. शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन प्रदीप मोरे यांनी केले.शिक्षण परिषदेमधील ओपनिंग ऍक्टिव्हिटी आणि मागील वर्षाच्या शिक्षण परिषदांचा मागोवा तुषार भदाणे यांनी एकात्मिक पाठ्यपुस्तकातील माझी नोंद वापराबाबतच्या मार्गदर्शक सूचना उत्तम चारोस्कर सर यांनी तर प्रशस्त अ‍ॅप विषयी माहिती अभय पेशट्टीवार यांनी दिली. आभार प्रदर्शन अनिल गायकवाड यांनी केले.