तील्लोळी येथे वाचनालयाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण संपन्न...

NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण
दिंडोरी : तालुक्यातील तील्लोळी येथे सोशल नेटवर्कींग फोरम, ग्राम पंचायत व रिअल डायनॅमिक यांच्या यांच्या संयूक्त विद्यमाने गाव तेथे वाचनालय या शैक्षणिक चळवळीअंतर्गत तिल्लोळी येथे १८ व्या वाचनालयाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
अमेरिका येथील रिअल डायनॅमिकच्या आर्थिक सहयोगातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता यावा यासाठी सुसज्ज वाचनालय सुरू करण्यात आले. प्रथमता गावातून टाळमृदुंगाच्या गजरात वाजतगाजत ग्रंथदिंडी काढण्यात आली.एसएनएफ चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी प्रास्तविक केले. सोशल नेटवर्कींग फोरम, ग्रामपंचायत तिल्लोळी आणी रिअल डायनॅमिक यांच्या प्रयत्नातून ग्रामस्थांना एक चांगले ज्ञानपीठ उपलब्ध झाल्याने रामदास भरसट, सुसन वर्गीस यांनी सांगितले.
याप्रसंगी रियल डायनॅमिकचे योगेश कासट,व्दारकानाथ कासट, भागिरथी कासट,प्रमोद भदाणे, निलेश काबरा,शितल काबरा,संजय बिरार, राकेश जायभावे,रोशन चांडक, सभाजित यादव, सिध्दी काबरा, पेठ तालुका समन्वयक रामदास शिंदे, दिंडोरी तालुका समन्वयक जयदिप गायकवाड,सरपंच मनिषा भरसट, उपसरपंच दशरथ बुनगे अदिसह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयदीप गायकवाड तर ग्रामसेवक रावसाहेब मिस्तरी यांनी आभार मानले.