CA इंटरमीडिएट परीक्षेत यवतमाळच्या सानिका गंगमवार'चे यश
NEWS15 मराठी प्रतिनिधी - किरण मुक्कावार
यवतमाळ : अतिशय अवघड समजल्या जाणाऱ्या सीएच्या इंटरमीडिएट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये यवतमाळ येथील आर्य वैश्य समाजाची कुमारी सानिका संजय गगंमवार या मुलीने दोन्ही ग्रुप मध्ये घवघवीत मार्क मिळवून यश संपादन केले आहे.
तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व आर्य वैश्य समाज बांधवाकडून तसेच मित्र परिवाराकडून कौतुक होत असून, तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. तर तिने या यशाचे श्रेय तिचे आई-वडील आणि गुरुजनांना दिले आहे.