घुबडी गावातील चिमुकल्यांनी गणेशउत्सवात राबविली 'वृक्षारोपणाची'संकल्पना... गावकरी प्रेरित...

घुबडी गावातील चिमुकल्यांनी गणेशउत्सवात राबविली 'वृक्षारोपणाची'संकल्पना... गावकरी प्रेरित...

प्रतिनिधी - गजू कैलासवार, यवतमाळ

पर्यावरणाचे संवर्धन, समाजात जागरूकता, बाप्पाची शाश्वत भक्तीने; झाले गावकरी प्रेरित... घुबडी या गावातील चिमुकल्यांनी गणेशउत्सवात राबविली 'वृक्षारोपणाची'संकल्पना

यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यात 'घुबडी' या गावात जि. प. उ. प्रा. शाळेत शिकणाऱ्या' बाल गणेश मंडळाच्या'पुढाकाराने वृक्ष लागवड करण्यात आले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी आणि निसर्गाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या 'बाल गणेश मंडळाच्या चिमुकल्यांकडून वृक्षारोपण करण्यात आले.

या उपक्रमामुळे पर्यावरणाची काळजी घेण्यात आले, पर्यावरणाची हानी कमी करणे आणि समाजात 'वृक्षारोपण' सारख्या पर्यावरणपूरक परंपरा मुलांमध्ये रुजलेली दिसत आहेत. घुबडी या गावातील जि. प. शाळेत विध्यार्थ्यांना उच्चप्राथमिक शिक्षणा सोबतच गणेशोत्सवासारख्या पवित्र प्रसंगी वृक्षारोपण करून, निसर्गाप्रति आदर व्यक्त केला जावा आणि पर्यावरणपूरक भक्तीची एक नवी ओळख जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री.रविंद्र आगिरकर सर, श्री. ठाकरे सर, श्री. मेश्राम सर यांनी मुलांना मार्गदर्शनातून निर्माण करून दिले.

हा उपक्रम मुलांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला असून, या उपक्रमात 'बाल गणेश मंडळाचे चिमुकले अध्यक्ष चरणतेज गडसनवार, चाणक्य खडसे, रुद्रा खडसे, विकास मिचकंट्टीवार, शुभम बोगेवार, नानु चुक्कलवार, नयन पेदापेल्लीवार, वेदांत अन्नेलवार, आदित्य खडसे, युग कुमरे इत्यादी चिमुकले सक्रियपणे सहभागी होऊन; वृक्षारोपणातून निसर्गाला एक नवी भेट दिली. त्यांची प. समिती, पोलीस सुरक्षा विभाग, पर्यावरणप्रेमी, वनविभाग, घुबडी ग्रामस्थ इत्यादी स्तरातून मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा प्रकारचं कौतुक होत आहे. वृक्षारोपण हा एक शाश्वत उपक्रम आहे जो गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणाला आणि समाजाला घुबडी या गावातील चिमुकल्यांनी योगदान दिले.