यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव २०२३-२४ स्पर्धेत खराबवाडी प्राथमिक शाळेचा डंका...!
![यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव २०२३-२४ स्पर्धेत खराबवाडी प्राथमिक शाळेचा डंका...!](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_659bed1a4b8f1.jpg)
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
खेड(राजगुरूनगर): यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव २०२३-२४ स्पर्धेत खराबवाडी शाळेने डंका वाजवला आहे. खराबवाडी शाळेतील इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी कु. काव्या किरण किर्ते(मोठा गट)वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे. विशेष म्हणजे या प्राथमिक शाळेच्या इतिहासात वैयक्तिक स्पर्धेत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकवला आहे. काव्याचे यश हे शाळेसाठी भूषनावह आहे.
या विद्यार्थिनीने या अगोदरही अनेक स्पर्धेत आपली चुणूक दाखवून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. काव्या किर्तेला तिच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आशा जाधव, अहिरे मॅडम, वाबळे मॅडम, ज्ञानेश्वर मोकाशी, भुते सर, होरे सर,दरोडे सर, कातोरे सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचं बरोबर शालेय व्यवस्थापन समिती यांचे अनमोल सहकार्य लाभले.