मोहाडी येथे आनंद मेळावा उत्सवात साजरा...!

मोहाडी येथे आनंद मेळावा उत्सवात साजरा...!

News15 मराठी प्रतिनिधी बापू चव्हाण 

दिंडोरी : मविप्र संचलित अभिनव बाल विकास मंदिर या ज्ञान संकुलात आनंद मेळावा आठवडे बाजारचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे अभिनव शालेय समिती सदस्य एस.एस.जाधव प्रा. बाळासाहेब अडसरे, बाकेराव जाधव, उत्तमराव जाधव,विठ्ठलराव जाधव, प्रदीप जाधव आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये असलेले कलागुण यांना उत्तेजन देण्यासाठी असा उपक्रम विद्यालयात राबविण्याबाबत माहिती अभिनव मुख्याध्यापिका सोनाली देशमुख यांनी दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या,रानभाज्या,पाले भाज्या, फळभाज्या आनंद मेळाव्यामध्ये विक्रीसाठी ठेवल्या होत्या. विद्यार्थ्यांनी सकाळपासून उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे जाधव यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी माफक दारात भाज्यांची विक्री केली. विद्यार्थ्यांनी आनंद मेळावा यातून व्यवहार ज्ञान अनुभव व जीवन कौशल्य मिळवण्याचा प्रयत्न केला केल्याचे रूपाली जाधव यांनी सांगितले. राहुल पाटील,रूपाली जाधव,रोहिणी लोखंडे,अश्विनी फुगट,सायली जाधव,दीपाली पवार आदींनी संयोजन केले.