जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंबळी येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तक देवून स्वागत..!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंबळी येथे  शाळेच्या पहिल्या दिवशी  विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तक देवून स्वागत..!

News15 मराठी प्रतिंनिधी सुनील बटवाल

चाकण(चिंबळी):   जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंबळी येथे  शाळेच्या पहिल्या दिवशी  विद्यार्थ्यांचा स्वागत आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या शालेय गणवेश त्याचप्रमाणे पाठ्यपुस्तके यांचे वितरण  संपन्न झाला. या  कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतिश बारणे आणि कुरुळी येथील युवा उद्योजक शिवसेना नेते कालिदास  गोपाळे उपस्थित होते. त्याचप्रमाणे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य काळूराम बनकर, युवा उद्योजक तानाजी  जैदयुवा उद्योजक अमोल  बहिरट, दैनिक प्रभातचे पत्रकार सुनील बटवालशाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष अश्विनीताई जैद, शाळा व्यवस्थापन समितीचे तज्ञ संचालक शामराव बहिरट इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 याप्रसंगी  मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले व प्रमुख पाहुण्यांचा सन्मान ज्येष्ठ अध्यापक भोर  आणि बडे सर यांच्या हस्ते करण्यात आला. तर, प्रास्ताविक आणि आभार मुख्याध्यापक उपरे मॅडम यांनी केले.