चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील श्री भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी उद्योजक अर्जुन सदाशिव कड यांची बिनविरोध निवड झाली
असल्याची माहिती सचिव रोहिदास गव्हाणे यांनी दिली.
सर्वांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून तानाजी खराबी यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी अर्जुन कड यांचा एकमेव अर्ज
आल्याने त्यांना बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हनुमंत कड, मावळते चेअरमन तानाजी खराबी, व्हा. चेअरमन श्रीमती आशा शांताराम खराबी, संचालक ज्ञानेश्वर कड, अमृता खराबी, मच्छिंद्र कड, संजय कड, राजेंद्र पवार, विठ्ठल बिरदवडे, संगिता खराबी, तज्ञ संचालक नवनाथ कड, रामचंद्र खराबी, सतीश खराबी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित चेअरमन अर्जुन कड यांचा संचालकांनी सत्कार केला. खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी अर्जुन कड यांची चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.