आमचे खासदार पाहिले का खासदार, शिर्डी लोकसभा मतदारसंघातील नागरिकांची आर्त हाक..

News15 प्रतिनिधी आशिष ढगे पाटील शिर्डी : लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी आमचे खासदार पाहिले का पाहिले अशी आर्त हाक दिली आहे. फक्त मते मागण्यासाठी खासदार आमच्याकडे येतात त्यानंतर मतदारसंघात फिरकतही नाहीत..शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे निवडून आले आणि त्यातच त्यांचे राज्यातही सरकार आले आणि त्यांचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी कर्जमाफीचा मोठा निर्णय सत्तेत आल्यावर घेतला अकोले तालुक्यातील बऱ्याच गावातील शेतकर्यांना अजून कर्ज माफीचा लाभ भेटला नाही. त्यातच ओला दुष्काळाची भरपाईसाठी पंचनामे असतील किंवा मदत असेल याबद्दल खासदार यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. यामुळे अकोले तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या निवडणुकीत मोदी लाटेत आणि विखे पाटील यांच्या पाठिंब्यावर खासदार लोखंडे निवडून आले. आणि त्यानंतर जसे गायब झाले तसे परत मतदारसंघात फिरकलेच नाहीत सर्वसामान्यांची कामे तर दूरच राहिलेत. खासदार लोखंडे यांच्या काळात अकोले तालुक्यात तुर्रळक किरकोळ कामे सोडता असे एकही ठोस काम अजून तरी पहायला मिळाले नाही अशा बिनकामी खासदाराला निवडून दिल्याचा मोठा पच्छाताप सामान्य नागरिक बोलून दाखवत आहेत. खासदार कुणाच्या सुख दुःखातही कधी दिसत नसल्याने आमचे खासदार कुणी पाहिले का? अशी आर्त हाक मारताना नागरिक दिसत आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित असताना जर लोक प्रतिनिधी त्याकडे डोळेझाक करत असतील तर त्यांनी परत आमच्याकडे मत मागण्याची तस्ती न घेतलेलीच बरी असे मतदारसंघातील नागरिक बोलून दाखवत आहे. खासदार लोखंडे यांनी जर उर्वरित काळात त्यांचा हा कारभार सुधरवला नाही तर त्यांना मतदारसंघात फिरणे मुश्कील झाल्या शिवाय राहणार नाही..