राजकीय : आमदार डॉ. किरण लहामटे यांना मंत्रीपदाची चाहूल, खरंच दादा मोठी जबाबदारी देणार का?
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
अकोले : अकोले विधानसभेचे दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे डॉ. किरण लहामटे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
राज्याच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी मुंबईत पार पडणार आहे. त्यातच यावेळी मंत्री मंडळात काही जुने काही नवे चेहऱ्यांना संधी देण्याचे सूत्र ठरले आहे. त्यात अजितदादा पवार यांच्या पक्षाला ६ आमदारांच्या मागे एक मंत्रीपद असे गणित धरले तरी त्यांच्या पक्षाला ८ ते ९ मंत्रिपदे मिळू शकतात. त्या मंत्रीमंडळात सर्व घटकांना प्रतिनिधित्व द्यायचे म्हंटले तरी, अहमदनगर जिल्ह्यातून ४ घड्याळाचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यात अकोले, कोपरगाव, अहमदनगर, पारनेर मतदारसंघातून हे उमेदवार निवडून आले आहेत. यात जर राजकीय समीकरणे बघितली तर, मंत्रीपदासाठी अहमदनगर मतदारसंघांचे आमदार संग्राम जगताप तर आदिवासी चेहरा म्हणून अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे आमदार डॉ. किरण लहामटे हे नवखा चेहरा असल्यामुळे त्यांना मंत्री मंडळात राज्यमंत्री पद भेटू शकते असे तर्क लावले जात आहेत. त्या तुलनेत अजितदादा पवार यांच्या पक्षात नरहरी झिरवाळ व धर्मराव बाबा आत्राम हे आदिवासी समाज्याचे प्रतिनिधित्व करतात. पण त्यांना या अगोदरही वेळोवेळी मंत्रीमंडळात संधी मिळाली असल्याने कुठे तरी त्यांच्या ऐवजी डॉ. किरण लहामटे यांचा विचार होऊ शकतो अशी चर्चा मुंबईत रंगू लागली आहे.
त्यातच अजितदादा पवार हे आजच दिल्लीला गेले असून त्यांच्या पाठोपाठ आमदार डॉ. किरण लहामटेहे दिल्लीला गेल्याने आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या मंत्रीपदाच्या चर्चानी अजूनच जोर धरला आहे.
आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या राजकारणातील समतोलाच्या गोष्टी सोडता त्यांचा विकासात्मक कामे करण्याचा हातखंडा आहे. याचा नक्कीच जबाबदारी भेटली तर फायदा तालुक्याच्या विकासाला गती देण्यास होणार आहे. आमदार डॉ. किरण लहामटे यांचे सोबर राजकारण असल्याने त्यांच्या राजकारणातील आलेख हा चढता राहिला आहे. त्यामुळे त्यांना जर मंत्री पदाची संधी भेटली तर अकोले तालुक्यात विकासाचा डोंगर उभा राहिल्या शिवाय राहणार नाही. शेवटी अजितदादा पवार यांनी ठरवले तर प्रामाणिक कार्यकर्त्याला ओळखायला ते चुकत नाहीत. त्यांनी आमदार साहेब यांना कामाची पोच पावती द्यायचे ठरवले तर नक्कीच डॉ. किरण लहामटे आमदाराचे नामदार झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्की..