विधानसभा निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यातून मुस्लिम समाजाला एक उमेदवारी द्या.! मोईज शेख यांची मागणी...
प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुस्लिम समाजाला एक उमेदवारी द्यावी अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहित शेख यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व वरिष्ठांकडे केली आहे.
लातूर येथे घेण्यात आलेल्या काँग्रेस पक्ष कार्यकारणी बैठकी दरम्यान निवेदन देऊन मागणी केली असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोईज शेख यांनी आज दिनांक ११ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.