राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्षपदी दत्तात्रय पाटील यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्षपदी दत्तात्रय पाटील यांची निवड

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील रहिवासी तथा राष्ट्रवादीचे नेते दिंडोरी बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय पाटील (शरद पवार गट) यांची दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.त्याप्रसंगी दत्तात्रय पाटील यांना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पक्ष अध्यक्ष  शरद पवार यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.त्या प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील, जितेंद्र आव्हाड, युवक प्रदेशाध्यक्ष मेहमूब भाई शेख, कोंडाजी मामा आव्हाड,शाम हिरे भास्कर भगरे,आधी उपस्थित होते.

निवडीनंतर पाटील यांनी सांगितले की आपण निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळवून देऊ पक्षाचे संघटन मजबूत करणार असून सर्व पक्ष पदाधिकारी कार्यकर्त यांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे सांगितले त्यांच्या या निवडीचे सर्व  क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.