खराबवाडी ग्रामपंचायतची निवडणूक वॉर्ड रचना जाहीर...!

खराबवाडी ग्रामपंचायतची निवडणूक वॉर्ड रचना जाहीर...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : खराबवाडी ग्रामपंचायत निवडणूकीची वॉर्ड रचना आज(दि.८) रोजी जाहीर करण्यात आले आहे.

खराबवाडी ग्रामपंचायतच्या निवडणूकीची वॉर्ड रचना चाकण मंडळाधिकारी चेतन चासकर, तलाठी शाम वाल्हेकर व खराबवाडी ग्रामपंचायत ग्रामविकासधिकारी रमेश चौरे यांच्या उपस्थित काढण्यात आली. यावेळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

खराबवाडी गावाची वॉर्ड निहाय रचना पुढील प्रमाणे...

खराबवाडी गावात एकूण ६ वॉर्ड असून त्यात एक नंबर वॉर्डमध्ये अनुसूचित जातीसाठी १, सर्वसामान्य प्रवर्गासाठी १, सर्वसामान्य स्त्री साठी १ जागा निघाली आहे.

वॉर्ड नंबर दोनमध्ये अनुसूचित जमाती १, अनुसूचित जाती स्त्री १, सर्वसाधारण १ जागा निघाली आहे.

वॉर्ड नंबर तीनमध्ये अनुसूचित जाती स्त्री १ व सर्वसाधारण १ अशी जागा निघाली आहे.

वॉर्ड नंबर चारमध्ये सर्वसाधारण १, सर्वसाधारण स्त्री २ जागा निघाल्या आहेत.

वॉर्ड नंबर पाचमध्ये सर्वसाधारण १, सर्वसाधारण स्त्री २ जागा निघाली आहे.

वॉर्ड नंबर सहामध्ये सर्वसाधारण १, सर्वसाधारण स्त्रीसाठी २ जागा निघाल्या आहेत.

खराबवाडी ग्रामपंचायतची निवडणूक बऱ्याच प्रतीक्षेनंतर होत असल्याने गावातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.