कुरुळी गावाच्या उपसरपंचपदी प्रतिभा कांबळे यांची बिनविरोध निवड..!

कुरुळी गावाच्या उपसरपंचपदी प्रतिभा कांबळे यांची बिनविरोध निवड..!

News15 मराठी प्रतिंनिधी सुनील बटवाल

चाकण(चिंबळी): कुरुळी ता. खेड येथील ग्रामपंचायतीच्या उपसंरपचपदी प्रतिभा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे ग्रामविकास अधिकारी कविता कोतवाल यांनी सांगितले.

कुरूळी ता. खेड येथील ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी या हेतूने उपसरपंच अमोल शांताराम सोनवणे यांनी ठरल्याप्रमाणे स्वखुशीने उपसरपंच पदाचा राजीनामा दिला असल्याने या रिक्त जागेसाठी ग्रामपंचायतीच्या शिवछत्रपती सभागृहात सरपंच अनिता बधाले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत उपसंरपच पदासाठी प्रतिभा कांबळे यांचा सर्वानुमते एकच अर्ज दाखल करण्यात आला.

एकच अर्ज प्राप्त झाल्याने प्रतिभा कांबळे यांची उपसरपंचपदीं बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच अनिता बधाले यांनी घोषित केले. यावेळी सर्व सदस्य उपस्थित होते याप्रसंगी नवनिर्वाचित उपसंरपच कांबळे यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम सोनवणे, सरपंच अनिता बधाले व सर्व सदस्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होते.