रमेश लांबोटे यांची ढोबळेवाडी - माचरटवाडी गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड...

रमेश लांबोटे यांची ढोबळेवाडी - माचरटवाडी गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, निलंगा

लातूर जिल्हातील निलंगा तालुक्यातील ढोबळेवाडी - माचरटवाडी ग्रुप ग्रामपंचायत गावच्या; महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते रमेश  लांबोटे तर उपाध्यक्षपदी उपाध्यक्ष लिंबराज वाघमोडे यांची निवड करण्यात आली आहे. तर या पार्श्वभूमीवर निटूर मोड येथील परिसरातील शिरोळ, वांजरवाडा, केळगाव  मित्र परिवार, पत्रकार मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये रमेश लांबोटे यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी प्रतिष्ठित नागरिक लतीफ भाई चाऊस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पत्रकार के. वाय. पटवेकर, पत्रकार जावेद मुजावर, नामदेव तेलंग, व्यापारी पंकज भालके, इमाम सरदार, साबेर चाऊस स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

ढोबळेवाडी - माचरटवाडी येथील ग्रामस्थांच्या विविध अडचणी उद्भवल्यास त्यांना योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन करून, त्यांची गावातील तंटे गावातच मिटवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे श्री. लांबोटे यांनी सांगितले.