कार आणि मोटरबाइकचा भीषण आपघात, आपघातात दुचाकीस्वार जागीच ठार...

कार आणि मोटरबाइकचा भीषण आपघात, आपघातात दुचाकीस्वार जागीच ठार...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

अहमदपुर तालुक्यातील परचंडा पाटी जवळ; एका भरधाव स्विफ्ट कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने या भीषण अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात असणाऱ्या हिराबोरी तांडा येथील रहिवाशी; मोकिंद उत्तम जाधव (वय २९) हा तरुण काही कामानिमित्त आला होता. तो MH26 BA 2558 या क्रमांकाच्या दुचाकीवरून रात्रीच्या वेळी परत जात असताना प्रचंडा पाटी जवळ समोरून भरधाव वेगात येणाऱ्या; कार क्रमांक MH24 V 6848 या कार चालकाने समोरून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात मोकिंद उत्तम जाधव यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी मोकिंदचे वडील उत्तम जाधव यांच्या तक्रारीवरून किनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे करीत आहेत.

मृतक... मोकिंद उत्तम जाधव